Entertainment

…या प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला रियाचा सडकून समाचार… म्हणाली,’सुशांतचे क्रेडिट कार्ड्स तू वापरत होतीस. त्याची बहिण नाही’

By PCB Author

August 10, 2020

मुंबई, दि.१० (पीसीबी) : टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. जगभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोक मतं मांडत असते. यावेळी तिने सुशांत मृत्यू प्रकरणावरुन अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर टीका करत निशाणा साधला आहे. खोटं बोलून तुला नेमकं काय साध्य करायचंय? असा प्रश्न तिने रियाला विचारला आहे.

“तुला नेमकं काय साध्य करायचं आहे? बहीण-भावामध्ये भांडणं होतच असतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो तुझ्यासोबत राहात होता बहिणीसोबत नाही. तू त्याच्या क्रेडिट कार्ड्सचा वापर करत होतीस त्याची बहिण नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन काम्याने रियावर टीका केली आहे. रियाने अलिकडेच सुशांतच्या काही वॉट्सअॅप चॅटचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर शेअर केले होते. सुशांत आणि त्याच्या बहिणीमध्ये भांडण असल्याचा दावा तिने या चॅटमार्फत केला होता. तिच्या या कृतीवर काम्याने संताप व्यक्त केला आहे.

सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रियाविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला दोषी समजले जात आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचा आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. या प्रकरणी सध्या ईडी आणि CBI मार्फत तिची चौकशी केली जात आहे.

What is she trying to prove with this? Bhai behen meh jhagde hote rehte hai koi badi baat nahi hai… n most imp he was staying with you n not his sister.. all the credit cards were used by you, not his sister!!! #chorkidaadhimehtinka #JusticeForSushantSinghRajput #rheakireality https://t.co/SYxEhd5gyH

— Kamya Shalabh Dang (@iamkamyapunjabi) August 9, 2020