Maharashtra

‘या’ नेत्याने अजित पवार, मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो एकाच बॅनरवर लावून दिल्या शुभेच्छा!

By PCB Author

July 23, 2019

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नरेंद्र पाटील यांनी  एका बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो लावून दोन्ही नेत्यांना  अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोमवारी(दि.२२)  वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा झाला.  या निमित्त अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांना समाज मध्यमांवरून शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी बॅनरवर वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा  एकत्रित फोटो लावून शुभेच्छा दिल्या. तर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो देखील एकाच बॅनरवर दिसून आले. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेही फोटो या बॅनरवर लावण्यात आले  आहेत.