Videsh

‘या’ देशात आढळला कोरोना पेक्षाही भयंकर संसर्गजन्य आजार

By PCB Author

July 18, 2021

विदेश,दि.१८(पीसीबी) – अमेरिकेतील टेक्सास शहरात मंकीपॉक्स  या दुर्लभ संसर्गजन्य आजाराचा रुग्ण आढळला आहे. गया है. ‘सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रीव्हेंशन’ यांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. मंकीपॉक्स या रोगाचा टेक्सासमध्ये आढळलेला पहिला रुग्ण होय. या रुग्णाने नायजेरियावरुन अमेरिकेत प्रवास केला आहे. सध्या या रुग्णावर डलास येथे उपचार सुरु आहेत.

डलास काऊंटी जज क्ले जेनकिन्स यांनी मंकीपॉक्स या रोगाबद्दल बोलताना सांगितलं की, तुर्तास या रुग्णांपासून कोणताही धोका नाही. नायजेरियाशिवाय आफ्रिका खंडात मंकीपॉक्स या रोगाचा प्रकोप 1970 मध्ये पाहायला मिळाला होता. CDC च्या माहितीनुसार, 2003 मध्ये मंकीपॉक्स या आजाराने अमेरिकेत तांडव घातला होता. मंकीपॉक्स आढलेल्या रुग्णाची प्रवास हिस्ट्री काढण्याचं काम सुरु आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कातील सर्वांची चाचणी केली जाणार असल्याचे सीडीसीने सांगितले.

मंकीपॉक्स व्हायरस हा स्मॉलपॉक्स व्हायरससारखाच असतो. तज्ज्ञांच्या मते, हा आजार तसा घातक नाही आणि त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यताही तशी कमी आहे. मंकीपॉक्सची बहुतेक प्रकरणं सौम्य असतात. काही आठवड्यांतच हा आजार बरा होतो. पण कधी कधी हा आजार गंभीरही होऊ शकतो. श्वसनातून हा आजार पसरतो.

मंकीपॉक्स हा जुना व्हायरस आहे. 1970 मध्ये हा व्हायरस आफ्रिकन देशांमध्ये अतिप्रमाणात आढळला होता. सध्याही काही ठिकाणी या रोगाचे रुग्ण आढळतात. उष्णकटिबंध परिसरात, मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील देशातील दुर्गम भागात हा व्हायरस पसरतो. त्यामुळेच या व्हायरसचे पश्चिम आफ्रिकी आणि मध्य आफ्रिकी असे दोन मुख्य प्रकार आहेत.

सुरुवातीला ताप, सूजडोकेदुखी, कमरेत वेदना, स्नायूंमध्ये वेदनाचिकनपॉक्ससारखेच त्वचेवर पुरळ येणंताप आल्यानंतर असे पुरळ येऊ लागतात.चेहऱ्यावर पुरळ येतात मग ते शरीरावर पसरतातसामान्यपणे हात, हाताचे पंजे आणि पायांच्या तळव्यांवर पुरळ येता.दोन ते तीन आठवडे हा व्हायरस शरीरात राहू शकतो.