‘या’ ठिकाणी आढळला भारतातील पहिला ‘ओमायक्रॉन’ चा रुग्ण ?

0
733

बंगळुरू,दि.३०(पीसीबी) – दक्षिण आफ्रिकेत मागील आठवड्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन आढळल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर जगभरात काळजी आणि भीतीचे वातावरण पसरले होते. अशातच शनिवारी बंगळुरू येथील केम्पेगोवडा विमानतळावर दक्षिण आफ्रिकेतून दोन कोरोना रुग्ण आल्याची माहिती समोर आली. या दोन रुग्णांपैकी एकाला ओमायक्रॉनचा संसर्ग झाला असल्याची शक्यता कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी व्यक्त केली आहे.

के. सुधाकर पत्रकारांना म्हणाले, ” नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून बंगळुरूमध्ये आलेल्या दोन रुग्णांपैकी एका रुग्णांचा सॅम्पल डेल्टा व्हेरिएंट पेक्षा वेगळा आहे. याबाबत सध्या केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ICMR च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहोत, त्यामुळे अधिकृतपणे याबद्दल काही बोलता येणार नाही. पण या व्हेरिएंटचे सॅम्पल डेल्टापेक्षा वेगळे आहेत.