‘या’ चार कारणांमुळे जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त करण्याचा राज्यपालांचा निर्णय  

0
417

श्रीनगर, दि. २२ (पीसीबी) – जम्मू काश्मीर विधानसभा बरखास्त केल्याने राजकीय भूकंप झाला आहे. दरम्यान, राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विधानसभा तात्काळ प्रभावाने भंग  केल्याचे सांगितले जात आहे. यामागे चार प्रमुख कारणे  असल्याचे राजभवनाने  बुधवारी रात्री प्रसिध्द केलेल्या  निवेदनात म्हटले  आहे.  आमदारांचा घोडेबाजार होण्याची शक्यता आणि विरोधी राजकीय विचारधारेच्या पक्षांकडून स्थायी सरकार मिळण्याची शक्यता कमी असल्याने विधानसभा बरखास्त केल्याचे या निवेदनात म्हटले आहे.