Entertainment

‘या’ गावात आहे अभिनेता सोनू सूद यांचं मंदिर…

By PCB Author

December 21, 2020

तेलंगणा, दि.२१ (पीसीबी) : कोरोना लॉकडाउनच्या काळात आणि त्यानंतरही अनेक लोक आपल्या घरांपासून लांब होते. त्यावेळी यां गरजवंतांना मदतीचा हात देण्यासाठी अभिनेता सोनू सूद पुढे आले. आता त्यांच्या या कार्यामुळे त्यांची नवीन ओळख तयार झाली आहे. चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता आता खऱ्या आयुष्यात लोकांचा नायक ठरला आहे. याची आता नवी ओळख बनली आहे. लोकांनी सोनूच्या दातृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक मंदिर उभारलं आहे. यामुळे अभिनेता सोनू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

हे मंदिर तेलंगाणातील डब्बा टेंडा गावातील लोकांनी उभारलं असून २० डिसेंबर रोजी या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मंदिरामध्ये ग्रामस्थांनी सोनू सूदचा एक पुतळा बसवला आणि तसेच त्याची आरतीही केली. आरतीनंतर ग्रामस्थांनी ‘जय हो सोनू सूद’ अशी जोरजोरात घोषणाबाजीही केली. लॉकडाउनमध्ये या गावच्या लोकांची सोनू सूदने मदत केली होती, गावातील लोकांनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे मंदिर उभारुण त्यांचे आभार मानले आहेत. या मंदिर उदघाटन प्रसंगी गावातील लोकांनी पारंपारिक वेश परिधान केले होते. यावर प्रतिक्रिया देत सोनू सूदने लोकांच्या या भावनांची दखल घेत भावनिक ट्विट केलं. ‘मी यासाठी अपात्र आहे’ अशा शब्दांत सोनूने आपली जागा मंदिरात नसल्याचं सूचकपणे म्हटलं आहे.

Don’t deserve this sir.
Humbled🙏 https://t.co/tX5zEbBwbP

— sonu sood (@SonuSood) December 21, 2020

यावेळी जिल्हा परिषद सदस्य गिरी कोंडाल रेड्डी यांनी आपल्या भावनाना वाट मोकळी करत म्हणाले कि, “सोनू लोकांच्या अडचणीवेळी देवासारखा धावून आला होता त्यामुळेच त्याची जागा मंदिरात देवा ठिकाणी आहे. त्यामुळे आम्ही सोनूसाठी मंदिर उभारलं आहे. आमच्यासाठी तो देवचं आहे.” तसेच सोनू सूदचा पुतळा साकारणारे कलाकार मधुसूदन पाल म्हणाले, “आपल्या मदतशीर स्वभावाने या अभिनेत्यानं लोकांच्या हृदयात जागा निर्माण केली आहे. त्यामुळे मी देखील त्यांना भेट म्हणून सोनूची छोटीशी मूर्ती तयार केली.”