‘या’ गावात अजब फतवा; महिलांनी गाऊन परिधान केल्यास २ हजारांचा दंड

1229

हैदराबाद, दि. १० (पीसीबी) –  आंध्रप्रदेशमधील  एका गावात महिलांसाठी अजब आदेश देण्यात आला आहे. आंध्रच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका गावात महिलांना  गाऊन परिधान करण्यास मनाई करण्यात आली आहे.  या गावात दिवसा  गाऊन घालण्यावर महिलांना बंदी घालण्यात आली आहे.

आंध्रच्या टोकालापाल्ली गावातील नऊ सदस्यीय समितीने हा आदेश दिला आहे. गावात एकूण १८०० महिला आहेत. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ दरम्यान कुठल्याही महिलेने  गाऊन घातला. तर २ हजार रुपये दंड ठोठावला जातो. कुठली महिला आदेशाचे उल्लंघन करत असेल, तर त्याची माहिती देणाऱ्यास १ हजार रुपये दिले जातात.

नियम मोडणाऱ्या महिलेने दंड भरला नाही, तर सामाजिक बहिष्कार घालण्याची धमकी देण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. सरकारी अधिकाऱ्यांना काही सांगू नका, अशी समजही या गावकऱ्यांना देण्यात आली होती.  गाऊनवर कपडे धुणे, किराणा मालाच्या दुकानात जाणे, सभांना उपस्थित रहाणे, चांगले दिसत  नसल्याचे  टोकालापाल्ली गावच्या सरपंचांनी सांगितले.