…या कारणामुळे शरद पवार पंतप्रधानपदासाठी योग्य – सुशीलकुमार शिंदे  

0
683

सोलापूर, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार माढामधून दुसऱ्यांदा लोकसभा लढवत आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. ते विद्वान आहेत. त्यांचे काम मोठे आहे त्यामुळे त्यांच्या नावाचा पंतप्रधानपदासाठीही योग्य वेळी विचार होईल, असे सुचक विधान काँग्रेस नेते व माजी  केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अंतिम चर्चा सुरू आहे. तर शरद पवार पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरणार असून त्यांची माढा लोकसभा मतदारसंघातून  उमेदवारी निश्चित  झाल्याची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीने ज्येष्ठ नाटककार आणि ९९ व्या नियोजित मराठी संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शिंदे बोलत होते.