…या कारणामुळे भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रकांत पाटील अनुत्सुक

0
463

मुंबई, दि. १३ (पीसीबी) –  महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यावर पक्षात विचार सुरू असताना अतिरिक्त कार्यभारामुळे पाटील संघटनात्मक जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसल्याचे समजते. यामुळे  भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी पक्षश्रेष्ठींकडून विचारणा झाल्यास पाटील  नकार देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

महत्वाची खाती आणि शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण सारख्या महत्वाच्या उपसमितीचे अध्यक्ष पद सोडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक जबाबदारी स्वीकारण्यास  पाटील अनुकूल नाहीत. दरम्यान,    चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढे आली होती. यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींचे एकमत  झाल्याचे बोलले जात आहे.

पण चंदक्रांत पाटील पदा स्वीकारण्यास राजी नाहीत.त्यामुळे भाजप श्रेष्ठींकडून कोणाच्या नावांवर शिक्कामोर्तब होतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.  दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्याने रिक्त झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्षपद कुणाला मिळणार?  यावर आता चर्चा सुरू झाली आहे.