या कारणामुळे देशभरातील ५० कोटी मोबाइल ‘डिस्कनेक्ट’ होणार

441

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – देशभरातील जवळपास ५० कोटी मोबाइल ग्राहकांना केवायसी  संबंधित अडचणी येण्याची शक्यता आहे. सिम कार्ड पडताळणीसाठी खासगी कंपन्या ग्राहकांकडे आधार मागू शकत नाहीत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर नव्याने पडताळणी करावी लागणार आहे. त्यावेळी ग्राहकांनी आवश्यक पुरावे सादर न केल्यास संबंधित सिम कार्ड ‘डिस्कनेक्ट’ केले जाण्याची शक्यता आहे.