‘या’ अँपमुळे वाढतायेत गुन्हे; अँपवरून आधी केली मैत्री आणि नंतर…

0
403

वाकड, दि. १० (पीसीबी) – टिंडर डेटिंग अॅपवर ओळख झाल्यांनतर त्याचा गैरफायदा घेत महिलांवर बलात्कार करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. टिंडर डेटिंग अॅपवरून ओळख झालेल्या मित्राने एअर होस्टेस असलेल्या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. त्यानंतर आता एका तरुणाने विधवा असलेल्या महिलेसोबत टिंडर डेटिंग अॅपद्वारे मैत्री करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अमन दीपक सिंग (वय 29, रा. डांगे चौक, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार 12 जून 2020 पासून 24 सप्टेंबर 2020 या कालावधीत जे डी पॅराडाईस ताथवडे, स्टे-इन हॉटेल पुनावळे, कम्फर्ट एक्झिक्युटिव्ह हॉटेल मारुंजी, द आदिती इन हॉटेल विनोदे वस्ती हिंजवडी या ठिकाणी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमन आणि पीडित महिलेची ओळख टिंडर या डेटिंग अॅपवरून झाली. त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर अमन याने महिलेला लग्नाचे अमिश दाखवले. महिला विधवा असल्याचे माहिती असताना अमन याने तिला ताथवडे, पुनावळे, मारुंजी, हिंजवडी येथील विविध हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. महिलेने त्याला लग्नाबाबत विचारले असता त्याने महिलेच्या तोंडावर बूट फेकून मारला आणि लग्नाला नकार दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.