…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल

0
540

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – भाजप अध्यक्ष  अमित शहा यांच्यासाठी दुर्बीण मागवली  आहे.  ती दुर्बीण मी शहा यांना भेट म्हणून देणार आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दुर्बीण लागेल, असे म्हटले होते. मात्र, तीन राज्यांमधील निकाल पाहता आता शहा यांनाच दुर्बीण लागेल, असा पलटवार काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी आज (शनिवार) केला आहे.

हैदराबाद येथील भाजप युवा महाअधिवेशनात बोलताना अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना काँग्रेसला शोधण्यासाठी दुर्बीण लागेल, असे म्हटले होते. हाच धागा पकडत आज कपिल सिब्बल यांनी तीन राज्यांचा दाखला देत अमित शहा यांच्यावर पलटवार केला आहे.

दरम्यान, राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे की,  केंद्र सरकारने दिलेल्या माहितीच्या आधारे निर्णय दिला. केंद्राने न्यायालयात चुकीची माहिती दिली. महाधिवक्त्यांना लोकलेखा समितीसमोर हजर राहण्याचे आदेश द्यावेत आणि  न्यायालयात चुकीची माहिती माहिती दिल्याबद्दल त्यांच्याकडून खुलासा मागवावा. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे, असे सिब्बल म्हणाले.