Maharashtra

याला आमच्या महाराजांचा जयजयकार करायला कमीपणा वाटतो का? – अमेय खोपकर

By PCB Author

February 22, 2020

मुंबई,दि.२२(पीसीबी) – आमचे असंख्य मुस्लिम बांधव आहेत. ज्यांच्यासमोर कुणी छत्रपती शिवाजी महाराज की असं ओरडलं तरी ते आनंदाने जय अशी गर्जना करतात. मग या नवाब मलिकांना इतकी मग्रुरी का? महाराजांचा जयजयकार करण्यात कमीपणा वाटतो का? असा सवाल मनेसे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये सर्व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना नवाब मलिक शांत उभे असल्याचं दिसत आहे. यावरून अमेय खोपकर यांनी नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, अशा प्रवृत्तीच्या माणसाने राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदावर राहावं हे तुम्हाला पटतं का? या पक्षाचे अध्यक्ष आहेत ज्यांना त्यांचे समर्थक डायरेक्ट ‘जाणता राजा’ संबोधतात त्या शरद पवारांना तरी असा माणूस कसा चालतो? असा सवाल अमेय खोपकर यांनी केलाय.