Maharashtra

यापेक्षा लाचार मी शिवसेनेला कधीच पाहिले नाही – देवेंद्र फडणवीस

By PCB Author

February 27, 2020

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – ‘आम्ही अभिरूप विधानसभा भरवून त्याच पवित्र सभागृहात गौरवाचा प्रस्ताव मंजूर केला. ज्या पद्धतीचे लिखाण ‘शिदोरी’ मासिकात आहे, ते पाहता काँग्रेसच्या नेत्यांना अंदमानच्या कालकोठडीतच पाठविण्याची गरज असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी येथे यावेळी बोलताना मांडले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘गेले २५ ते ३० वर्ष मी शिवसेना पाहतो आहे. पण, यापेक्षा लाचार मी शिवसेनेला कधीच पाहिले नाही. कुठे मणिशंकर अय्यर यांच्या छायाचित्राला जोडे मारणारे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कुठे वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे मुख्यमंत्री,’ अशी टीका फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली.