Maharashtra

….यापुढे कोकणातील शेतकऱ्यांनीही कर्ज भरू नये – नितेश राणे

By PCB Author

February 25, 2020

मुंबई, दि.२५ (पीसीबी) – सध्या राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात झाली आहे. आमचे सरकार केवळ घोषणा करणारे नाही तर योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगत कर्ज माफ करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्यात आली.

तसेही शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. तर यापुढे कोकणातील शेतकऱ्यांनीही कर्ज भरू नये असे म्हणत भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली आहे.

कर्जाच्या यादीत कोकणातल्या 1 ही शेतकऱ्याला कर्जमाफी नाही कारण कोकणात आपले कर्जे 100% भरतात..npa होत नाहीत!!
मग कर्ज भरणाऱ्यांना आणि न भरणाऱ्यांना एकच न्याय !!
मग यापुढे कोकणच्या शेतकऱ्यांनी भरूच नये..
तसे ही माफ होणारच आहे..

— nitesh rane (@NiteshNRane) February 24, 2020