यशस्वी माध्यामिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश

0
563

भोसरी, दि, २१ (पीसीबी) – यशस्वी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळून विद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. बोर्डाच्या परीक्षेत ८५.८० टक्के मिळवून गायत्री अनिल हंडाळ हिने प्रथम क्रमांक पटकवला, ७१.२० टक्के मिळवून अंकिता अनिल गवई हिने व्दितीय क्रमांक पटकवला तर ६९.४० टक्के मिळवून हिना मुस्काफ शाबादी हिने तृतीयी क्रमांक पटकवला आहे. तर विद्यालयाच्या ७५ टक्के निकाल लागला आहे.

यावेळी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते, संस्थेचे सचिव तुषार देवकाते यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.