Maharashtra

यवतमाळमध्ये माजी नगर उपाध्यक्ष सुभाष दुधे यांचा निर्घृण खून

By PCB Author

October 14, 2018

यवतमाळ, दि. १४ (पीसीबी) –  दारव्हाचे माजी नगर उपाध्यक्ष आणि सभापती सुभाष दुधे यांची आज (रविवार) सकाळी दहाच्या सुमारास दगडाने ठेचून  निर्घृण  हत्या करण्यात आली. एका जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

या हत्येची माहिती मिळताच राज्य राखीव दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौकशीसाठी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर दुधे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेनंतर काही काळ परिसरात तनावाचे वातावरण होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून मोठ्या प्रमाणात पोलीस घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.