Maharashtra

यवतमाळमध्ये भाजप कार्यकर्त्याचा निर्घृण खून

By PCB Author

December 14, 2018

आर्णी, दि. १४ (पीसीबी) – यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहराच्या भाजप कार्यकर्त्याचा आज (शुक्रवारी) दुपारी पावनेदोनच्या सुमारास तलवारीने सपासप वार करुन निर्घृण खून करण्यात आला.

निलेश हिंमतराव मस्के (वय ३०) असे खून झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी आर्णी शहरातील ग्राणीण रुग्णालय परिसरात भाजप कार्यकर्ता निलेशवर अज्ञातांनी तलवारीने सपासप वार करुन खून केला. हा हल्ला होत असताना अमित बुटले हे हल्लेखोरांना थांबवण्यासाठी गेले असता हल्लेखोराने त्यांच्यावरही हल्ला चढवला. या हल्ल्यात नीलेश मस्के ठार झाला असून बुटले यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.