यवतमाळमधील आर्णीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याने तणाव

0
1015

आर्णी, दि. ११ (पीसीबी) – यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेने तणाव निर्माण झाला. पाच नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघड झाले असून आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी आर्णीत आज (गुरुवार) बंदची हाक देण्यात आली. सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्णीत सातवीत शिकणाऱ्या मुलीवर पाच जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी सोएन शेख या नराधमाला अटक केली असून उर्वरित आरोपी अजूनही फरार आहेत. शेखला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, या घटनेमुळे आर्णीत संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, शहरात शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.