Pimpri

यमुनानगर तळवडे रस्त्यावर झाड कोसळले; दुचाकींची धोकादायक वाहतूक

By PCB Author

July 27, 2019

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. शुक्रवारी सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे यमुनानगरकडून तळवडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज सकाळी (शनिवार) मोठे झाड पडले. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना झालेले नाही. मात्र, या पडलेल्या झाडाखालून धोकादायकरित्या दुचाकीस्वार जात होते.

झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, झाडाखालून दुचाकीस्वारांची धोकादायकरित्या वाहतूक सुरू होती. दरम्यान, पोलिसांनी झाड हटविण्यास सुरूवात केली आहे.