यमुनानगरमध्ये पाच वर्षाखालील मुलांसाठी “प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र” सुरू करण्याची मागणी

0
288

 – भाजप युवा मोर्चा निगडी चिखली मंडल अध्यक्ष शिरीष जेधे यांची आयुक्तांकडे मागणी

निगडी दि.१६(पीसीबी) – सध्या राज्य शासन व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी विविध उपाययोजना व यंत्रणा उभा करत आहे त्याच दृष्टिकोनातुन यमुनानगर निगडी भागात नवजात बालकांपासून पाच वर्षांच्या बालकांना देण्यात येणाऱ्या विविध प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी केंद्र सुरू करण्याची मागणी भाजप युवा मोर्चा निगडी चिखली मंडल अध्यक्ष शिरीष जेधे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

शिरीष जेधे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे यांची भेट घेत लहान बालकांसाठी यमुनानगर भागात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली, त्याला प्रशासनाने सहमती दर्शवली असुन याठिकाणी पोलिओ, बीसीजी, रोटावायरस, पेंटा एमआर, वीट A यासारख्या विविध लसीचे डोस येथील बालकांसाठी देण्याची तात्काळ व्यवस्था करावी, यमुनानगर भागात हे केंद्र नसल्याने येथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी जावे लागते, सध्या गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांना घेऊन जाण्यास नागरिक भित असल्याने अशा लसीकरण केंद्रामुळे या बालकांना प्रतिबंधात्मक लस नजीकच्या ठिकाणी व योग्य प्रकारे मिळेल अशी मागणी जेधे यांनी यावेळी केली आहे व तसे लेखी पत्र आयुक्त राजेश पाटील यांनाही दिले आहे.

यावेळी भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रथमेश आंबेरकर व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.