Pimpri

यमुनानगरमध्ये पर्यावरण दिनानिमित्त रॅली; प्रतिकात्मक गाढवाने दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश

By PCB Author

June 06, 2019

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) –  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ संदीप बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली  ‘जगा व जगू द्या’  या संकल्पनेतून  निगडीतील यमुनानगर येथे अनोखी रॅली काढण्यात आली. या रॅलीतील प्रतिकात्मक संदेश वाहक गाढवाने पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा संदेश दिला.       

ही रॅली तीन अनोख्या गोष्टींमुळे विशेष आणि वेगळी ठरली!   चक्क छोटी मुले घोषणा देत होती . “ज्येष्ठ जागे व्हा आम्ही झाडे लावतो तुम्हीही लावा “,  या रॅली चे दुसरे अनोखे वैशिष्टय असे होते की की या रॅलीत एक प्रतिकात्मक संदेश वाहक गाढव सामील झाले . मी पालिका,माझी पाठ  थोपटा, लाखो किमतींची झाडे तोडणाऱ्या ना किरकोळ दंड घेवून मी (पालिका)सोडून देते आणि तेही लाकडा सहित , माझे कौतुक करा ! हा संदेश घेवून जात होते ! हे गाढव, आलेल्या प्रत्येक कडून आणि दुकाना दुकानात जावून पालिकेची पाठ थोपटून घेत होते !

या रॅलीचे तिसरे वैशिष्टय म्हणजे अनोखे पथ नाट्य  !  या पथ नाट्यात मारुती राया काही केल्या पूजा स्वीकारत नव्हते ! भक्तांनी मनधरणी केल्यावर भक्तांची कान उघाडणी करताना मारुतीराया म्हणत होते ” मूर्ख माणसा ,मला प्रसन्न्  व्हायचे  असेल तर मी निसर्गाच्या माध्यमातूनच होणार आणि तुम्ही निसर्गाचं ठेवला नाही ! मला प्रसन्न होण्याचे मध्यांच तुम्ही ठेवले नाही! मी कसा प्रसन्न होवू? आणि मग भक्त निसर्ग संवर्धनाचे अभिवचन मारुती राया ला देत होते ! देव नाही दगडात वास करतो झाडात!मंदिरे नाही झाडे वाचवा ! या घोषणांनी आकाश दुमदमून जात होते आणि मारुती राया प्रसन्न होत होते !

“अंत्य विधी साठी विद्युत दहिनीचा वापर करा “हा संदेश सुध्दा देण्यात आला !

बाल मंडळीतील  सिध्दार्थ,अभिषेक,हृषिकेश,ओमकार,गणेश, दीप, रोहित, भालचंद्र, कार्तिक इतर बाल मंडळीं आणि जगा व जगुद्या चे प्रवर्तक डॉ संदीप बाहेती सहकारी संदीप रांगोळे यांनी नियोजन केले.

या रॅलीत सचिन शिंदे, निसर्ग मित्र जगदीश मुंदडा , प्रदीप शाळिग्राम,  पिंपरी चिंचवड भूलतज्ज्ञ संघटनेचे प्रेसिडेंट डॉ सुमित लाड , महेश प्रोफेशनल फोरम चे प्रेसिडेंट अभिषेक  सदानी , महेश सांस्कृतिक मंडळ पदाधिकारी आणि इतर निसर्ग मित्रांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला .