यंदा तू कसा आमदार होतो तेच बघतो; अजित पवारांचा विजय शिवतारेंना इशारा    

0
914

बारामती, दि. २१ (पीसीबी) – शिवसेनेचे  राज्यमंत्री विजय शिवतारे आता पोपटासाराखा बोलायला लागलाय. शिवतारे… तू यंदा कसा आमदार होतो तेच बघतो, अजित पवारने एकदा ठरवले की एखाद्याला नाहीच आमदार होऊन द्यायचे, तर तो नाहीच आमदार होत,  अशा आपल्या खास शैलीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  शिवतारे यांना इशारा दिला.

बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची आज (रविवार)   बारामतीत सांगता झाली. या प्रचारसभेत अजित पवार यांनी   विजय शिवतारे यांच्यावर  जोरदार हल्ला चढवला.

यावेळी पवार यांनी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावरही तोफ डागली. तुझी डिग्री काय? तु काय बोलतो काय?  तुझ्या नावातच विनोद आहे. तु शिक्षणमंत्री आहेस ना,  तिकडे लक्ष दे की जरा, अशा शब्दांत  पवारांनी विनोद तावडेंची फिरकी घेतली. पवार म्हणाले की, निवडणूक काळात भाजपचे १० मंत्री बारामतीत आले. काय एवढी बारामती आवडायला लागली काय? असा मिश्किल सवालही त्यांनी भाजपला केला.