Chinchwad

म्हाळुंगे येथे किरकोळ भांडणाच्या रागातून एकाची दुचाकी पेटवली

By PCB Author

March 27, 2019

हिंजवडी, दि. २७ (पीसीबी) – किरकोळ भांडणाच्या रागातून एकाने दुचाकी पेटवून दिल्याची घटन समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.२६) दुपारी एकच्या सुमारास म्हाळुंगे परिसरात घडली.

याप्रकरणी आकाश राजेश मुंढे (वय २३,रा.म्हाळुंगे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, साईनाथ महादेव पानगटकर (वय २४,रा.महादेव मंदिराच्या मागे, म्हाळुंगे) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश आणि आरोपी साईनाथ हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तसेच ते एकाच परिसरात राहतात.  या दोघांमध्ये मंगळवारी सकाळी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यावेळी पानगटकर याने शिवीगाळ करत तुझी गाडी मी ठेवत नाही असा दम दिला होता. दरम्यान दुपारी एकच्या सुमारास पानगटकर याने मुंढे यांची होंडा शाईन दुचाकी पेटवून देत नुकसान केले. पोलीस उपनिरक्षक गिरीश चामले तपास करत आहेत.