Chinchwad

म्हाळुंगेत वॉचमेनच्या साथीने चार जणांनी पती-पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण करून लुबाडले

By PCB Author

September 22, 2018

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – सोसायटीच्या रखवालीसाठी ठेवलेल्या रखवालावदाराच्या साथीने तीन ते चार जणांनी भाडेतत्वावर राहणाऱ्या दाम्पत्याला लोखंडी रॉडने जबर मारहाण करून सोन्या-चांदीला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. २१) रात्री साडेअकराच्या सुमारास म्हाळुंगेतील सुहास मर्चंट व माधुरी चितळे यांच्या सोसायटीमध्ये घडला.

या प्रकरणी इंद्रपाल शिवलाल प्रजापती (वय ४०, रा. म्हाळुंगे, मुळशी, मुळ. बिहारीगंज, ता. ढिंगवस, जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बालाजी बोबडे आणि त्याच्या इतर तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रजापती दांम्पत्य हे मुळचे उत्तरप्रदेश मधील आहेत. ते म्हाळुंगे येथील सुहास मर्चंट आणि माधुरी चितळे यांच्या सोसायटीमध्ये भाडेतत्वार राहतात. काल (गुरूवारी) रात्री अकराच्या सुमारास हे दांम्पत्य खोलीत झोपले होते. झोपेत असताना सोसायच्या रखवालीसाठी ठेवण्यात आलेल्या रखवालदाराच्या साथीने तीने ते चारजणांनी मिळून प्रजापती दांम्पत्याच्या खोलीतील सोन्याचे आणि चांदिचे दागिने तसेच मोबाईल फोन असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला.

दरम्यान, प्रजापती दाम्पत्यानी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता या दाम्पत्याला चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत लोखंडी रॉडने जबर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर दोघांनाही साडीच्या साहाय्याने हातपाय बांधून घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.