‘…म्हणून हुकूमशहा हिटलरने आपल्याच मिशा कापण्याचे दिले होते आदेश’

0
424

‘हुकूमशहा हिटलरच्या’ या मनोरंजक सवयी; ज्यावरून समाजत कि, हिटलर नक्की कसा होता..?

आपण सर्वजण हिटलरला ओळखतो. ज्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकले. परंतु त्याच्या जीवनात अशा काही मनोरंजक गोष्टी असतील ज्या आपल्याला आजपर्यंत माहित नाहीत आणि त्या गोष्टी आपल्याला हिटलरला अधिक जवळून जाणून घेण्यास मदत करतील, मग आपण हिटलरच्या जीवनाबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

१. हिटलरकडे बोलणाऱ्या कुत्र्यांची फौज होती –
डॉ. जन बॉन्डिस यांच्या म्हणण्यानुसार, हिटलर आणि त्याचे निष्ठावंत सेवक यांच्याकडे भरपूर कुत्रे होते. जेव्हा जेव्हा एखादा कुत्रा भुंकेल तेव्हा त्याचा असा अर्थ व्हायचा कि, तो कुत्रा हिटलरला युद्ध जिंकण्यात मदत करेल. यावरून हे अनुमान काढले जाऊ शकते की, हिटलर त्याच्या कुत्र्यांशी मनाने किती जोडला गेला होता. त्याचे दोन मुख्य कुत्रे ब्लॉन्डी आणि बेला होते. (हिटलरने स्वतःची हत्या करण्यापूर्वी त्याच्या या कुत्र्यांना ठार मारले.)

२. अन्नाची चव घेण्यासाठी त्याने लोकांना नोकरीवर ठेवले होते –
विनोदाने आपण म्हणू शकतो की हिटलर वेडा माणूस होता. तो इतका वेडा होता कि त्याने अन्नाची चव घेण्यासाठी सुद्धा लोकांना नोकरीवर ठेवले होते. हिटलरला जर्मन शाकाहारी भोजन आवडायचे.

३. हिटलर डिज्नीचा चाहता होता –
जितक्या लवकर आपण हिटलरला समजणे थांबवतो तेवढेच ते आपल्यासाठी चांगले होईल. आपल्यासाठी डिज्नी हे मुलांच्या चित्रपटाचा संदर्भ देते, तर हुकूमशहा असलेल्या हिटलरला त्याचा अर्थ न्यूरोसायन्स होता. हुकूमशहा हिटलरच्या म्हणण्यानुसार डिज्नी १९३७ पासून अ‍ॅनिमेशनच्या जगात प्रभावी काम करत होता. हिटलरला डिज्नी पाहण्याची खूप आवड होती.

४. हिटलरला “लोकांचा माणूस” म्हंटल जायचं – 
हिटलर आपल्या लक्झरी आणि सोईसाठी हजारो रुपये खर्च करत असल्याचे आत्मचरित्रकार व्होल्कर अलरीच यांनी नुकतेच समोर आणून दिले. पण तरीसुद्धा हिटलरला “लोकांचा माणूस” असे संबोधले जात असे.

५. स्वत:चे फोटो पाहून तो भाषण देण्याचा सराव करायचा – 
हिटलरला त्याच्या स्वतःच्या फोटोंचे खूप वेड होते. हिट्लरचे फोटो काढण्यासाठी त्याचाच एक हेंरीच होफ्फमन नावाचा फोटोग्राफर होता. हेंरीच हिटलर भाषण देत असताना किंवा भाषण बनवताना हिटलरचे फोटो काढायचा. जेणेकरून भाषण देताना किंवा लिहिताना हिटलर कसा दिसतो हे स्वतः हिटलरला समजेल.

६. हिटलरने आपल्याच मिशा कापण्याचे आदेश दिले होते –
हिटलरला आपण मिशांशिवाय कधीच पाहिले नसेल. मात्र, हिटलरला मिशा ठेवणे फार आवडायचे. त्यामुळे हिटलर वारंवार आपल्या मिशामध्ये बदल करायचा. पण दुर्दैवाने पहिल्या महायुद्धात सेवा बजावताना त्याने आपल्या मिशा कापायचे आदेश दिले होते.

७. हिटलर एक उत्कृष्ट कलाकार होता –
आपल्या सर्वांना माहित आहे की हिटलर कलेतील अपयशानंतरच त्याचे आयुष्य कम्युनिस्टविरोधी विचारात गेले, परंतु आपणास हे माहित नाही की हिटलरने 2 वेळा आर्ट स्कूलमध्ये अर्ज केला होता आणि शाळेने त्याचा अर्ज नाकारला होता. आणि त्याला प्रवेश परीक्षेस बसण्याची परवानगीही नव्हती. आजही कला तज्ञांचे मत आहे की, ‘हिटलर एक उत्कृष्ट कलाकार होता.’

शिवाय, हिटलरला चॉकलेट खूप आवडत असायचे. तो दिवसातून किमान एक किलो चॉकलेट खायचा. हिटलर चार्ली चॅपलिनचा खूप मोठा चाहता होता. चार्ली चॅपलिनच्या मिशा त्याला खूप आवडायच्या म्हणून त्याने स्वतःदेखील चार्ली चॅपलिनसारख्या मिश्या ठेवल्या होत्या. हिटलरच्या मिशांना “टूथब्रश मिश्या” सुद्धा म्हणतात. हिटलर एक प्रभावी वक्ता देखील होता. जेव्हा जेव्हा हिटलर भाषण द्यायचा तेव्हा लोक त्यांचे भाषण आपली सुदबुध विसरून जायचे.

हिटलरच्या स्वभावाची हि बाजू कोणालाच माहित नव्हती. कदाचित म्हणूनच हिटलरला संपूर्ण जग घाबरायचे.