Entertainment

…म्हणून सलमान खाननं आ. ऋतुराज पाटलांचे केले कौतुक

By PCB Author

April 24, 2020

 

मुंबई, दि.२४ (पीसीबी) – कोरोनाच्या या संकटकाळी अनेक मदतीचे हात पुढे येत आहे. तसेच आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर, नर्स, पोलिस बाहेर पडत आहेत यांना युवा आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वखर्चातून मदत केली आहे.

आमदार पाटील यांनी कोल्हापूरमधील खाजगी डॉक्टर, आयसोलेशन हॉस्पिटल, कम्युनिटी क्लिनिकमधील डॉक्टर, १०८ रुग्णवाहिका डॉक्टर आणि चालक, व्हाईट आर्मी जवान यांना स्वखर्चाने १ हजार पीपीई किट दिले आहेत.

याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेते सलमान खान यांनी आमदार पाटील यांचे ट्विटद्वारे कौतुक केले आहे. याचप्रमाणे ‘बीईंग ह्यूमन’ या संस्थेच्या माध्यमातून आपण करीत असलेले काम पथदर्शी आहे. करोनाच्या संकटात मी शक्य त्या मार्गाने लोकांना मदत करत आहे. लवकरच करोनाचे संकट दूर होईल असा विश्वास आ. पाटील यांनी सलमान खान यांना प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.

दरम्यान, देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देखील सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

Superb work of supplying 1000 ppe kits for doctors… @ruturajdyp

— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 22, 2020