Lifestyle

…म्हणून शांत झोपेसाठी औषधं घेण्याआधी हे उपाय नक्की करा आणि गाढ झोपा

By PCB Author

January 06, 2021

आपल्या धावपळीच्या जीवनात काही गोष्टी अशा घडतात ज्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतात. आपल्या कामाची शिफ्ट आपल्या आयुष्यावर परिणाम करते. आपल्या खाण्यापिण्यावर, जेवणावर एकूणच परिणाम होत असतो. कारण शांत झोप येण्यासाठी प्रत्येकवेळी औषध घेणे आज ना उद्या आरोग्यासाठी घातक ठरतेच. जर तुम्हाला सुद्धा अशी सवय असेल किंवा आपण सुद्धा अश्या त्रासाने हैराण झाले असाल तर हे पुढील उपाय एकदा तरी करून पहा…तुम्हाला नक्की हळूहळू फायदा होण्यास सुरुवात होईल.

१. झोपताना मोबाईल सारखी उपकरण वापरणं शक्यतो टाळावे. एखादे सकारात्मक पुस्तक वाचा. ज्यामुळे सकारात्मक विचार मस्तिष्काला शांती देते.

२. व्यावहारिक उपचार- काही खास व्यावहारिक उपायांमुळे देखील अनिद्रेची समस्येचा उपचार होऊ शकतो जसे – जर झोप नसेल येत तर बिस्तरावर जाऊ नये. झोपण्याच्या खोलीचा वापर फक्त झोपेसाठी करावा. बिस्तरावर पडल्या पडल्या झोपेची वाट पाहू नये. जेव्हा झोप येत असेल तेव्हाच बिस्तरावर पडावे.

३. जर आपल्याला नियमित व्यायामाची सवय असेल तर यामुळे शरीराची चांगल्याप्रकारे हालचाल होऊन चांगली झोप येते, पण यासाठी झोपण्याअगोदर व्यायाम करू नये.

४. आपली झोपेची खोली शांत व अंधारात असेल तर उठण्याची व झोपण्याची नियमित दिनचर्या आपोआप बनते. शवासन हे झोपेसाठी लाभदायक आहे.

५. दर रोज सकाळी एका निश्चित वेळेवर उठा. रात्री निश्चित वेळेवर झोपा. लेट नाइट पार्टी व टीव्हीचा लोभ सोडा. दिवसा झोपू नये, ज्याने रात्री झोप लागण्यास मदत मिळेल.