Maharashtra

…म्हणून शरद पवारांच्याविरोधात शड्डू ठोकण्यास तयार – महादेव जानकर

By PCB Author

February 17, 2019

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची गर्जना राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी  केली आहे.  हिंद केसरीची कुस्ती लढायला  मज्जा असते, म्हणूनच  पवारांच्याविरोधात शड्डू ठोकण्यास तयार आहे, असे जानकर यांनी म्हटले आहे.

मुंबईत एका वृत्तवाहिनीशी बोलताना जानकर यांनी शरद पवारांविरोधात  लढण्याबाबतचे कारण सांगितले. जानकर पुढे म्हणाले की,  भाजपकडे आम्ही सहा जागांची मागणी केली  आहे. आम्हाला किमान दोन तरी जागा मिळाल्या पाहिजेत. त्यात माढा आणि बारामती मिळवण्यासाठी  आम्ही प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणूक भाजपच्या चिन्हावर आम्ही कधीच लढणार नाही. तर आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर लढणार आहोत. भाजपने माढा आणि बारामती  सोडल्यास  माढ्यातून लढण्यास तयार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी यावेळी केला.