…म्हणून रूम पार्टनरनेच चोरी केली मित्राची पल्सर

0
204

पिंपरी, दि. 30 (पीसीबी): एकाच खोलीत राहणा-या दोन मित्रांनी मिळून रूम पार्टनर असलेल्या तिस-या मित्राची रोख रक्कम, सोन्याची चेन, मोबाईल, कागदपत्रे आणि पल्सर दुचाकी चोरून नेली. ही घंटा मंगळवारी (दि. 29) सकाळी मेदनकरवाडी, चाकण येथे उघडकीस आली.

राकेश रतिलाल मोते (रा. चांदसैलर, ता. शहादा, जि. नंदुरबार), करण गणेश पावरा (रा. भोगरा, नंदुरबार) अशी चोरट्यांनी नावे आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश आनंद वाघ (वय 30, रा. मदनकरवाडी, ता. खेड. मूळ रा. भाईंदर वेस्ट, जि. ठाणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश, आरोपी राकेश आणि करण हे तिघेजण मेदनकरवाडी येथे एकाच खोलीत राहतात. फिर्यादी एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. सोमवारी (दि. 28) दुपारी साडेबारा ते मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या कालावधीत आरोपींनी गणेश यांची रोख रक्कम, सोन्याची चेन, मोबाईल फोन, कागदपत्रे आणि रूम समोर पार्क केलेली पल्सर दुचाकी (एम एच 04 / के एच 9110) असा एकूण दोन लाख 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.