Maharashtra

…म्हणून म्हातारा माणूस राज्यभर फिरत आहे – संजय राऊत

By PCB Author

October 19, 2019

नाशिक, दि. १९ (पीसीबी) –  काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आपआपल्या मतदारसंघात अडकून पडल्याने  म्हातारा माणूस संपूर्ण राज्यभर फिरत आहे,  असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते राज्यभर फिरत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे.  वयोवृद्ध माणसाने हातपाय हालवत फिरायले हवे, प्रकृती नीट राहते, असेही  राऊत यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सातऱ्यात सभा सुरु असताना मुसळधार पाऊस कोसळू लागला, पण पवारांनी भर पावसात आपले भाषण थांबवले नाही.  पवारांचा भर पावसात भाषण देतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत.

यावर राऊत यांनी  राष्ट्रवादीवर आणि शरद पवार यांच्यावर येवला-लासलगावचे शिवसेना उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारसभेत  बोलताना निशाणा साधला .

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या  प्रचारात  शरद पवार यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी  राज्य पिंजून काढले आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी  उन्हा-पावसाची तमा न बाळगता ते सभा घेत आहेत. सहकारी नेते सोडून गेले तरी त्यांनी आपली जिद्द आणि  स्पिरीट कायम ठेवत कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे काम करत आहेत. यावर  समर्थकांतून पवार यांच्यावर  कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.  तर विरोधक त्यांच्यावर टीका करू लागले  आहेत.