Desh

…म्हणून मुस्लिम कुटुंबाने बाळाचे नांव ठेवले नरेंद्र मोदी  

By PCB Author

May 25, 2019

लखनऊ दि. २५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरूवारी (दि.२३) जाहीर झाला. पंतप्रधान  मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. या दिवशी उत्तर प्रदेशातील गोंडा या शहरात मुस्लीम कुटुंबात  एका बालकाचा जन्म  झाला. हा बालक पंतप्रधान मोदींच्या विजयोत्सवाचा साक्षीदार ठरला आहे.  याची आठवण कायमपणे राहावी, यासाठी  मुस्लीम कुटुंबाने आपल्या बालकाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुस्लीम कुटुंबातील या बालकाचा जन्म २३ मे या लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशीच झाला. या बालकाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवत या मुस्लीम कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रती आपले प्रेम प्रकट केले आहे. तर सर्वधर्मसमभावाचे एक अनोखे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. यावरून मोदींचे नागरिकांच्या मनावर किती गारूड आहे, याची प्रचिती येते.