‘….म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र’; म्हणाले…

0
211

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. नाशिक-मुंबई, मुंबई-पुणे-हैद्राबाद या बुलेट ट्रेन संदर्भात हे महत्त्वाचं पत्र मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पाठवल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये दोन बुलेट ट्रेन्सचा प्रस्ताव त्यांनी मोदी यांना दिला आहे. या दोन प्रस्तावांचा उल्लेख रेल्वे मंत्रालयानेही केला होता.

नागपूर-नाशिक-मुंबई ही एक बुलेट ट्रेन करण्यात यावी. तसंच समृद्धी महामार्गाला नांदेड-जालना असा मार्गही जोडला जाणार आहे, तोच मार्ग औरंगाबाद पुणे मुंबई असा करण्यात यावा आणि नांदेडवरुन तो मार्ग पुढे हैद्राबादला जोडला जावा आणि हैद्राबाद नागपूर मुंबई अशी एक बुलेट ट्रेन करण्यात यावी, असा प्रस्ताव पंतप्रधानांना दिलेला आहे. मात्र पूर्वीचा गुजरात- मुंबई जोडणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गाविषयी या पत्रात कोणताही उल्लेख केलेला नाही आणि रेल्वे मंत्रालयाने लवकरात लवकर याचा विचार करावा जेणेकरुन महाराष्ट्राच्या विकासात हातभार लागेल तसंच हैद्राबादचं मार्केट आणि मुंबईचं मार्केट दोन्ही जोडता येईल असा प्रस्ताव या पत्राद्वारे मांडण्यात आलेला आहे.