Maharashtra

..म्हणून मी संघ सोडला – शरद पोंक्षे

By PCB Author

December 23, 2019

मुंबई, दि.२३ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दंड चालवायला शिकवतात. पण मारायची वेळ आली की बौद्धिक घेतात, म्हणून आपल्याला ते पटत नाही. त्यामुळे मी संघ सोडला आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक झालो, असे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राम्हण होते म्हणून त्यांना विरोध होत आहे. सावरकर आणि त्यांच्या पत्नी यांनी कधीही जातीभेद मानला नाही. ते अन्य जातीचे असते तर त्यांना विरोध झाला नसता. यामागे जातीयवादाचे राजकारण आहे,” कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाचा रविवारी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते