‘….म्हणून मित्रानेच घातला मित्रालाच गंडा; व्हाट्सअँप वरची मैत्री पडली महागात’; नक्की काय घडलं..

0
271

वाकड, दि. २१ (पीसीबी) – एका व्यक्तीच्या मित्राचा फोटो अज्ञात व्यक्तीने त्याच्या व्हाट्स अपच्या डीपीवर ठेवला. मित्र म्हणून चॅट करत तब्बल तीन लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 19) दत्त मंदिर रोड, वाकड येथे घडला.

पंकजकुमार चंदनसिंग रौतेला (वय 41, रा. दत्त मंदिर रोड, वाकड) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोबाईल क्रमांक 3208531206 धारक आणि 0170101030876 कॅनरा बँक खाते क्रमांक धारक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या व्हाट्स अपच्या डीपीवर फिर्यादी रौतेला यांचा मित्रा उमेश शर्मा यांचा फोटो ठेवला. त्यानंतर उमेश शर्माच बोलत असल्याचे भासवून आरोपीने फिर्यादी यांच्याकडे इमर्जन्सीचे कारण सांगत तीन लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी तीन लाख रुपये दिले. त्यानंतर तो त्यांचा मित्र शर्मा नसल्याचे उघडकीस आले. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.