Desh

 …म्हणून बालाकोटला लक्ष्य केले – परराष्ट्र सचिव    

By PCB Author

February 26, 2019

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – इंडियन एअर फोर्सने पीओकेमधील बालकोट येथे हवाई हल्ला करुन जैश-ए-मोहम्मदचा सर्वात मोठा तळ  उद्‌ध्वस्त केला आहे.  या कारवाईत मोठया संख्येने जैशचे दहशतवादी, ट्रेनर, सिनियर कमांडरचा खात्मा  झाला आहे,  अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.

आत्मघातकी दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी बालकोटमधील जैशच्या तळावर दहशतवाद्यांना प्रशिक्षण  दिले जात होते.  या ठिकाणी आत्मघातकी  हल्लेखोर  तयार  केले जात होते. त्यामुळे  कारवाईसाठी हे ठिकाण निवडण्यात आले, असे गोखले यांनी   सांगितले.

जैशचा म्होरक्या मसूद अझरचा मेहुणा मैलाना युसूफ अझहर हा तळ चालवत होता.  विशेष करून जैशच्या तळांवरच हा हल्ला करण्यात आला.  हल्ल्याच्यावेळी सर्वसामान्यांना  कोणतीही  झळ पोहचणार नाही,  याची दक्षता घेण्यात आली.  जंगलामध्ये  हे तळ होते,  असे गोखले यांनी सांगितले.