…म्हणून नारायण राणेंची भेट घेतली; शरद पवारांचा खुलासा

0
1681

कणकवली   दि. ३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची आज (सोमवार) कणकवली येथील घरी भेट घेतली. यावर मी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर   असताना राणेंनी मला फोन केला.  ते आमचे जुने सहकारी आहेत’,  म्हणून मुंबईला जाता जाता त्यांची भेट घेतली, असा खुलासा पवारांनी केला.   

गेल्या दोन दिवसापासून पवार सिंधूदुर्ग  जिल्हा दौर्‍यावर होते. आंबोली- वेंगुर्ला आणि मालवण येथे बैठका आटोपल्यानंतर आज  पवार हे कणकवलीत आले. त्यावेळी त्यांनी राणेंच्या घरात पाहुणचार घेतला. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. पवार-राणे भेटीमागील कारण जाणून घेण्याची  उत्सुकता प्रसारमाध्यमांच्या प्रधिनिधीसह राजकीय वर्तुळाला लागून राहिली होती.

दरम्यान, भेट झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना  पवार यांनी मिश्किल टिप्पणी  करत तुम्हाला ‘चाय पे कोणती चर्चा’ मिळणार नाही, आमची भेट ही मैत्रीच्या संबंधी होती. त्यामुळे उलट सुलट काही छापू नका, असे   पवार म्हणाले.  या भेटी दरम्यान आमदार नितेश राणे, योगेंद्र पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार यांची उपस्थिती होती.