म्हणून ‘त्या’ शिवसेना नगरसेविकेला पक्षाने दाखवला बाहेरचा रस्ता

0
411

रत्नागिरी, दि.२३ (पीसीबी) : रत्नागिरी रिफायनरीच्या समर्थनाच्या ठरावाच्या बाजूने मतदान केल्यानं त्यांच्यावर कारवाई करत राजापूर नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेविकेला पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांच्यावर ही कारवाई केलीय. राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्याकडून प्रतिक्षा खडपे यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी राजापूर नगरपरिषदेने रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा ठराव मांडला. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि सेनेच्या दोन नगरसेविकांनी समर्थन देत हा ठराव मंजूर केला. शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांना या ठरावाला पाठिंबा देत मतदान केलं. त्यामुळे प्रतिक्षा खडपे यांना पक्षातून काढले गेले आहे.

शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा खडपे यांनी पक्षाच्या विरोधात मतदान करून विरोधकांना पाठिंबा दिल्याचं कारवाईचे कारण देत राजापूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन होती. या ऑनलाईन सभेला ठरावाच्या बाजूने मतदान करताना शिवसेनेच्या आणखी एक दुसरी नगरसेविका ऑनलाईन नव्हती. त्या नगरसेविकेनेही ठरावाच्या बाजूने मतदान केलंय. त्यामुळे सभेच्या ठरावावर ज्या वेळी या नगसेविकेची सही होईल त्यावेळी या नगसेविकेवर कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हायला हवा, यासाठी आवाज उठलेला असताना राजापूर नगर परिषदेने देखील रिफायनरी प्रकल्पाचं समर्थन करताना तसा ठराव पारित केला आहे. हा ठराव अकरा विरुद्ध पाच असा पारित झालेला आहे.