…. म्हणून त्यांनी फोडले चक्क कपड्याचेच दुकान

0
309

चाकण, दि. 20 (पीसीबी) खेड तालुक्यातील शेलगाव येथे असलेल्या जय हनुमान कलेक्शन या कपड्याच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून 97 हजार 500 रुपये किमतीचे कपडे चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली. राजाराम नारायण आलम (वय 40, रा. बहुळ, ता. खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे शेलगावातील शेलगाव फाटा येथे जय हनुमान कलेक्शन नावाचे कपड्यांचे दुकान आहे. फिर्यादी यांनी शुक्रवारी दुपारी चार वाजता त्यांचे दुकान कुलूप लावून बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी  दुकानाच्या पाठीमागील पत्रा कापून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातून 97 हजार 500 रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे चोरुन नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.