….. म्हणून त्यांनी चोरल्या तब्बल 11 लाखांच्या सिगारेट

0
473

हिंजवडी, दि. २३ (पीसीबी) – सरकार चौक मारूंजी येथून अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे शटर उचकटून अकरा लाख 69 हजार 41 रुपये किमतीच्या सिगारेट चोरून नेल्या. ही घटना मंगळवारी (दि. 20) रात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास घडली.

रोशन रमेश वाधवाणी (वय 40, रा. पिंपरी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार चौक, मारुंजी येथे बॉम्बे एजन्सीचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये फिर्यादी रोशन वाधवाणी मॅनेजर म्हणून काम करतात. 20 जुलै रोजी रात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी बॉम्बे एजन्सीच्या गोडाऊनचे शटर उचकटून आत प्रवेश केला. गोडावूनमधून 11 लाख 69 हजार 41 रुपये किमतीचा विविध कंपनीचा सिगारेटचा माल चोरट्यांनी चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.