‘…म्हणून त्यांनी कॉन्ट्रॅक्टरकडेच खंडणी मागत दिली धमकी’

0
227

भोसरी, दि.०१ (पीसीबी) : कंपनीत कार वॉशिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या एका व्यावसायिकाला चार जणांनी मिळून कंपनीतील काम सुरु ठेवण्यासाठी 50 हजारांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास कॉन्ट्रॅक्टर व त्याच्या कामगारांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंटी तुपे (वय 21) आणि त्याचे तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अरुणकुमार बबनराव कापसे (वय 47, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कापसे हे कार वॉशिंग आणि डिटेलिंगचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांनी एका कंपनीमध्ये कार वॉशिंगचे काम घेतले आहे. त्या कंपनीतील काम सुरु ठेवण्यासाठी आरोपींनी कापसे यांच्याकडे 26 डिसेंबर रोजी प्रत्येक महिन्याला 50 हजारांची खंडणी देण्याची मागणी केली.

कापसे यांनी खंडणी न दिल्यास त्यांना व त्यांच्या कामगारांना मारून टाकण्याची धमकी दिली. याबाबत पाच दिवसानंतर कापसे यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.