…म्हणून तीन चायनीज सेंटरवर कारवाई

0
256

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – परवाना नसताना चायनीज सेंटरमध्ये लोकांना दारू पिण्यासाठी बसू दिले. याबाबत तीन चायनीज सेंटर चालकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. रविवारी (दि. 21) दुपारी ही पुणे-नाशिक रोड भोसरी येथे ही कारवाई करण्यात आली.

स्वप्नील विलास भाकरे (वय 35, रा. चिंचवड), अर्जुनखंड भंडारे (वय 32, रा. भोसरी), रुपेश रमेश बैचे (वय 28, रा. आळंदी रोड, भोसरी), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस नाईक धोंडीराम बालाजी केंद्रे (वय 33) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भाकरे त्याच्या मालकीचे चंद्रदीप चायनीज, आरोपी भंडारे त्याच्या मालकीचे ओम साई स्नॅक्स सेंटर, तसेच आरोपी बैचे यांच्या मालकीचे एस. पी. चायनीज, अशी दुकाने आहेत.

आरोपींनी त्यांच्या चायनीज सेंटरमध्ये लोकांना दारू पिण्यासाठी हॉटेलमधील जागेचा विनापरवाना बेकायदेशीरपणे वापर करू दिला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी दुपारी सव्वातीन वाजता तीन चायनीज सेंटरवर कारवाई करत तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.