…म्हणून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी

0
681

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – नाशिक, मनमाडमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे १२ नोव्हेंबर रोजी निधन झाले. गायकवाड यांच्या निधनावर सरकारने दाखवलेल्या उदासिनतेवर  विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी  महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर दिलगिरी व्यक्त  करण्याची वेळ आली.  

कॉ. माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर तब्बल ३० तास सरकारने त्यांच्या कुटुंबाशी कोणताही संपर्क केला नाही. शिवाय ३० तासांनंतर सरकारने संपर्क करुन आणखी दोन तास थांबा, असे उत्तर कुटुंबीयांना दिले. त्यावर सरकारने दिलगिरी व्यक्त करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण घटनेबाबत खेद व्यक्त केला. कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या अत्यंसंस्कराबाबत नेमके काय झाले, याची माहिती घेत आहोत. या सर्व घटनेची दिलगिरी व्यक्त करुन, नेमके काय झाले हे संध्याकाळपर्यंत समजेल, असे पाटील यांनी सांगितले.