म्यूकोरमायकोसिस पाठोपाठ आता हॅप्पी हायपोक्सियाचा धोका

0
607

पिंपरी,दि.१४( पीसीबी) – देशभरात कोरोनाचे संकट विक्राळ रुप धारण करीत आहे. कोरोना व त्यापाठोपाठ म्यूकोरमायकोसिस या जीवघेण्या आजाराने झपाट्याने पाय पसरायला सुरूवात केली असतानाच आता एका नव्या समस्येने आरोग्य तज्ञांची डोकेदुखी वाढविली आहे. समोर येत आहेत. कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेत, तरुणांना गंभीर लक्षणे आणि मृत्यूची बरीच प्रकरणे समोर येत आहेत. तर बऱ्याच राज्यांमध्ये कोरोनाचे असे रुग्ण समोर येत आहेत ज्यांच्यात कोरोनाची तोणतीही लक्षणे दिसत नाहीत मात्र बाधित झाल्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच त्यांचा मृत्यू होत आहे. अचानक ऑक्सिजनची पातळी कमी होऊन काही कळण्याच्या आतच ऑक्सिजनची पातळी ५०% पर्यंत कमी झाल्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. ऑक्सिजन पातळी कमी होण्याचे एक प्रमुख कारण ‘हॅपी हायपोक्सिया’ आहे.

हॅपी हायपोक्सियामध्ये शरीरातील व्हायरल लोडमुळे फुफ्फुसांचा त्रास सुरू होतो. कोरोनाचे हे नवे लक्षण तरूणांमध्ये दिसत आहे. यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होते. दरम्यान, असे घडल्यास अनेकांना हे कळतचं नाही. अचानकपणे ऑक्सिजनची ही पातळी घटून ८० टक्क्यांवर येते. यानंतर ऑक्सिजनची पातळी कमी होऊन 50% पर्यंत पोहचू शकते. या अवस्थेत श्वास घेण्यास त्रास, अशक्तपणा, घाबरणे, घाम येणे, चक्कर येणे आणि डोळ्यासमोर अंधारी येऊ शकते. दोन दिवसांपूर्वी सामान्य दिसणारा रुग्ण अचानक व्हेंटिलेटरवर जातो. याचा किडनी, हृदय आणि मेंदूवर परिणाम होतो. फ्फुसांमध्ये नसा बंद होऊ लागतात. रक्ताच्या गुठळ्या बनू लागतात. फुफ्फुसांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते.

कोरोना रुग्णांना पल्स ऑक्सीमीटरवर ऑक्सिजन तपासण्याचा सल्ला दिला जातो. लक्षणे नसलेल्या व्यक्तींना हॅपी हायपोक्सिया झाल्यावर त्यांच्या ओठांचा रंग निळा होतो. त्वचा लाल/नारंगी जांभळ्या रंगाची होते. विनाकारण घाम येतो. ऑक्सिमीटरमध्ये पातळी कमी होते. ही हायपोक्सियाचे लक्षणे आहेत. शरीरात होणाऱ्या बदलांना ओळखा. ऑक्सिमीटरचा प्रयोग करणे, सतत ऑक्सिजनची पातळी चेक करत राहाणे आणि अंगावर आजार न काढणे हेच हायपोक्सियापासून बचाव करण्याचे उपाय आहेत. जगभरातील ३० % कोरोना बाधित रुग्णांनध्ये हायपोक्सियाचे लक्षणे ज्यूंना आली आहेत.