म्युकोरमायसिस चे रुग्ण वाढत असून यंत्रणेने सुसज्ज राहावे ,आयुक्तांना निवेदन

0
231

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – म्युकोरमायसिस याबद्दल राज्यात वाढत असलेल्या रुग्ण यांना अनुसरून शहरातील नॉन कोविड हॉस्पिटल मध्ये 20 टक्के बेड राखीव ठेवावेत व यासाठी लागणाऱ्या यंत्रणेला सुसज्ज राहण्यास सांगावे जेणेकरून या आजाराचे काही रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर त्वरीत उपचार करणे सोपे होईल अशी मागणी शिवसेना महिला आघाडी च्या विभाग संघटिका मंदा शिवाजी फड यांनी केलीय ..
तसेच राखीव ठेवण्यात येणाऱ्या हॉस्पिटल ची माहिती महानगरपालिकेच्या वेबसाईट व सारथी ॲप्लिकेशनवर देण्यात यावी व तशी प्रेस नोट देखील जारी करावी. असं देखील म्हटलंय

दुसरे म्हणजे संपूर्ण देशात येऊ घातलेली तिसरा लाटे बद्दलची शंका व त्यामध्ये लहान बालक हे जास्त प्रमाणात प्रभावित होऊ शकतात याची देखील शंका वर्तवण्यात येत आहे त्यास अनुसरून आपल्या शहरात असणाऱ्या नर्सिंग होम व लहान मुलांवर उपचार करणारे हॉस्पिटल यांच्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये बेड्स राखीव करण्याची तयारी करावी तिसरा लाटेला प्रभावीपणे थोपवण्यासाठी यंत्रणा उभी करताना आपल्या शहरात जम्बो कोविड केअर सेंटर प्रमाणे बेबी केअर सेंटर देखील उभारता येऊ शकते का याची चाचपणी करावी व शहरात असणाऱ्या बाल रोग तज्ञ यांची एक टास्क फोर्स तयार करावी करावी.
त्याचप्रमाणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याकरिता प्रभावीपणे लसीकरण करण्यात यावे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे लसीकरण लवकरात लवकर करावे अशी मागणी देखील त्यांनी केलीय …