Pune

मोहसीन शेख खून प्रकरणातून जामिनावर सुटका होताच धनंजय देसाईने काढली रॅली; २४ जणांवर गुन्हा दाखल

By PCB Author

February 12, 2019

पुणे, दि. १२ (पीसीबी) – पुण्यात २०१४ मध्ये बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्टमुळे उसळलेल्या जातीय दंगलीत मोहसीन शेख या संगणक अभियंता तरुणाचा खून झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईसह २३ जणांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती.

मात्र १७ जानेवारी २०१९ रोजी धनंजय देसाईला जामिन मंजुर झाला त्यानंतर शनिवारी त्याची येरवडा कारागृहातून सुटका झाली. जामिन मिळून सुटका होताच हिंदू राष्ट्र सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी धनंजय याची शहरात रॅली काढली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाई आणि त्याच्या शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला.