Desh

मोहम्मद अझहरुद्दीन, विजया शांती काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार ?

By PCB Author

October 06, 2019

हैदराबाद, दि. ६ (पीसीबी) –  माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. मोहम्मद अझहरुद्दीन तेलंगना राष्ट्र समितीमध्ये (टीआरएस) प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री विजया शांती  भाजपमध्ये  प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

विजया शांती यांचे पती एम.व्ही. श्रीनिवास प्रसाद यांनी सांगितले की,  विजया शांती सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यांनी अद्याप भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही. परंतू, त्यांच्यासमोर एक प्रस्ताव आला आहे. त्यामुळे यासंबंधी त्या विचार करू शकतात. कारण, अनेक वर्षे त्या भाजपमध्ये होत्या.

मोहम्मद अझहरुद्दीन  टीआरएसमध्ये  प्रवेश करण्याची शक्यता आहे.  त्यांनी टीआरएस आणि के. टी. रामाराव यांच्या मदतीमुळे हैदराबाद क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपद मिळवले आहे. तसेच, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेण्यासाठी मोहम्मद अझहरुद्दीन प्रयत्न करत आहेत.