Desh

मोहन भागवतांकडे मोदी सरकारचा रिमोट कंट्रोल – राहुल गांधी

By PCB Author

February 07, 2019

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्याकडे मोदी सरकारचा रिमोट कंट्रोल आहे. भाजपची सत्ता आहे, असे जरी असले तरीही प्रत्यक्षात देश संघ चालवत आहे, हे वास्तव आहे, असा सनसनाटी आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. 

दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, भाजपच्या सत्तेत मोदी हे पंतप्रधान जरी असले, तरीही या सरकारचा रिमोट मोहन भागवत यांच्याकडे आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला आता उलथवून टाका, असे आवाहन राहुल गांधी यांनी यावेळी केले. यावेळी ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा देण्यात आला.

देशातील प्रत्येक सरकारी संस्थेत संघाचा एक तरी माणूस असला पाहिजे, हा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. मात्र आमची सत्ता आल्यावर आम्ही संघाशी संबंधित माणसाला हाकलून देऊ,  असा इशारा राहुल गांधी यांनी यावेळी दिला. मोदी सरकारकडून केवळ द्वेषाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे या सरकारचा पराभव झाला पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.