Pimpri

मोशीमध्ये दोन पादचा-यांना लुटले

By PCB Author

November 12, 2021

मोशी, दि. १२ (पीसीबी) – मोशी परिसरात रस्त्याने जाणा-या दोन पादचा-यांना लुटल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पहिल्या घटनेत तरुणाचा इयरफोन आणि रोकड तर दुस-या घटनेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. 11) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दीपक शांताराम साळुंके (वय 27, रा. चिखली) या तरुणाने पहिल्या याप्रकरणात फिर्याद दिली. त्यानुसार मोपेड दुचाकीवरील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 9) रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास फिर्यादी साळुंके मोशी गाव येथे रस्त्याने जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी साळुंके यांना शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण केली. तसेच इयरफोन आणि रोख रक्कम असा एकूण पाच हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

दुस-या घटनेत महिलेने दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 50 हजारांची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

पिंपरीतून दुचाकी चोरीला

घराजवळ पार्क केलेली 35 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 9) सकाळी बाबा हरदासराम मंडळ जवळ पिंपरी येथे उघडकीस आली. याप्रकरणी नरेंद्र भेरूमल दासानी (वय 55, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे