Bhosari

मोशीत वृध्द भाजी विक्रेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

By PCB Author

March 12, 2019

मोशी, दि. १२ (पीसीबी) – राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने एका वृध्द भाजी विक्रेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (मंगळवारी) पहाटे दीडच्या सुमारास मोशीतील खान्देशनगर येथून समोर आली.

बालाजी दामू खैरनार (वय ५८, रा. खान्देशनगर, मोशी) असे मृत भाजी विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे दीडच्या सुमारास वृध्द बालाजी यांनी राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना तातडीने पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृत बालाजी यांचा भाजीचा व्यवासय होता. त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप समजु शकले नाही.  भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.